महाआघाडी बाबत काँग्रेस पक्षा सोबत बोलणी सुरू आहे.काँग्रेसचा सलग तीनवेळा पराजय होत असलेल्या १२ जागा आम्हाला सोडाव्यात , आणि आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा मुद्द्यावर काँग्रेस चे एकमत असेल तरच आम्ही महाआघाडीत सामील होऊ. मात्र आजचा काँग्रेस पक्ष आरएसएस ला घाबरत आहे. काँग्रेस च्या उत्तराची वाट पाहू अन्यथा वंचीत बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील ४८ उमेदवाराची यादी तयार आहे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आठवलेंचे नाव न घेता ९ फेब्रुवारीच्या सभेत नीतिमत्तेचे पालन करा अन्यथा ठोकल्या जातील असा टोला लगावला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे योजना केले होते. या वेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील १२ लोकसभेच्या जागेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कुठल्या जागा काँग्रेस ने आम्हाला सोडाव्यात ते त्यांनी ठरवावे. आम्ही कोणत्याही जागेवर दावा केला नाही. काँग्रेसच मागील तीन निवडणुकीत सलग पराजय होत असलेल्या लोकसभेच्या १२ जागा आम्हाला सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. हि आघाडी तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा काँग्रेस पक्ष आरएसएस ला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या मागणी साठी तयार होईल. आरएसएस बाबत आमचा आरखडा तयार आहे. काँग्रेसकडून आम्हाला अजून उत्तर मिळालेले नाही. त्याच्या अजेंड्या नंतरच आम्ही आमचे मत त्यांच्या समोर ठेऊ. मात्र आजची काँग्रेस आरएसएस ला घाबरते असे आंबेडकर म्हणाले .
नीतिमत्ता सोडल्यास ठोकून काढू ; आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद शहरातील जबिंदा लॉन्स वर प्रचंड सभा झाली होती. त्या नंतर एका कार्यक्रमात त्याच मैदानावर आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाची विराट सभा याच मैदानावर घेईल अशी घोषणा केली होती. येत्या ९ फेब्रुवारीला आठवलेंची सभा आहे.या बाबत विचारले असता आठवलेंचे नाव न घेता आम्ही त्यांचे चॅलेंज स्वीकारतो मात्र नीतिमत्ता सोडू नका अन्यथा ठोकल्या जातील असा इशारा ऍड आंबेडकर यांनी दिली.
दंगली रोखण्यासाठी शांतात मार्च.
धर्म संसदे मध्ये राम मंदिर बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणेने देशात दंगली घडतील असा इशारा दिला आहे. देशासह महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २१ फेब्रुवारी अगोदर राज्यातील जिल्हा जिल्ह्यात शांतता मार्च काढण्यात येणार आहे. या मार्च मध्ये अनेक जाती धर्माचे नागरिक सहभागी होणार आहे. सहभागी नागरिक त्यांच्या जातीचे फलक हातात घेऊन या मार्च मध्ये सहभागी होणार आहे.